esakal | आंबेगाव : 11 तोळ्याची चैन चोरून फरार आरोपीस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

police

आंबेगाव : 11 तोळ्याची चैन चोरून फरार आरोपीस अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : डिंभे खुर्द (ता. आंबेगाव) येथील हेमलता घोलप यांच्या शिवकृपा निवास येथे 9 जणांनी अनाधिकाराने प्रवेश करून घरातील व्यक्तिंना लाथाबक्क्यांनी मारहाण करत 11 तोळे वजनाची गळयातील सोन्याची चैन बळजबरीने ओढून घेऊन फरार झालेला मुख्य आरोपी युवराज दशरथ गेंगजे यास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने व पोलीस पथकाने जीव धोक्यात घालू पाण्यात पोहोत जाऊन आरोपीस जेरबंद केले.

एक ऑगस्ट पासून हा आरोपी फरार होता. गोहे बुद्रुक येथील युवराज दशरथ गेंगजे, प्रिया कैलास गेंगजे, सोनी जनार्दन केंगले, रामा सोमा गेंगजे, गणेश गोविंद नाडेकर व इतर अनोळखी चार व्यक्ति यांनी त्यांचे नातेवाईक कैलास उर्फ बाबु दशरथ गेंगजे याचे खुनाचे गुन्हयात हेमलता घोलप यांची मुले असल्याचा राग मनात धरून त्यांच्या शिवकृपा निवास येथे 1 ऑगस्ट रोजी अनाधिकाराने प्रवेश करून त्यांना शिविगाळ, दमदाटी करून धमकी दिली व घरातील इतर व्यक्तिंना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून संतोष घोलप यांच्या गळयातील 3 लाख 30 हजार रूपयांची 11 तोळे वजनाची सोन्याची चैन ओढून फरार झाले.

हेही वाचा: आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ. नितीन करमळकर

याबाबतची तक्रार हेमलता घोलप यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. घोडेगाव पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना खबरीकडून माहिती मिळाली की, यामधील मुख्य आरोपी युवराज गेंगजे वाडा मार्गे त्याचे गावी गोहे बुद्रुक येथे येणार असल्याचे कळताचं माने यांनी त्वरीत पथक तयार करून दोन तुकडया तयार केल्या.

गोहे बुद्रुक . व गोहे खुर्द गावातील रस्त्यावर पथकातील पोलीस कर्मचारी दबा धरून बसले. त्यावेळी वाडा मार्गे युवराज गेंगजे मोटार सायकल वरून येताना पोलीस हवालदार दत्तात्रय जढर व अविनाश कालेकर यांना बघताच त्यांने गाडी भरधाव वेगाने चालवित निघाला. त्याच्या मागे मोटार सायकलवर हे दोन पोलीस कर्मचारी पाठलाग करत होते.

पुढे त्याला पथकातील दुसरी टीम दिसताच त्याने आपल्या जवळील मोटार सायकल रस्त्यावर सोडून ओढयावर असलेल्या कोल्हापुरी बंधा-यात भरपूर पाणी असताना देखिल पाण्यात उडी मारून पोहत पलीकडे जात होता त्यावेळी पोलीस पथकातील जालींदर रहाणे, नामदेव ढेंगळे यांनीही पाण्यात उडी मारून पोहत त्याचा पाठलाग केला. तर दुस-या बाजुने आरोपी बाहेर पळून जाऊ नये यासाठी सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने व पथकातील जढर व कालेकर हे भात खाचरांमधून त्या ठिकाणी पोहचले व त्यास जेरबंद केले.

loading image
go to top