Pune Crime News : पुण्यातील 'त्या' मर्डर मिस्ट्रीचं कोडं अखेर सुटलं, १५० CCTV अन् १२०० रिक्षांच्या तपासणीनंतर पोलिसांना यश...
Pune Woman Murder Case Solved : २० मे रोजी आंबेगाव भागात अज्ञात व्यक्तीने या महिलेच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार केले होते. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला होता.
२० मे रोजी पुण्यातील आंबेगाव परिसरात एका महिलेची हत्या झाली होती. धारदार शस्त्राने त्या महिलेच्या डोक्यावर वार करण्यात आले होते. अखेर या हत्याकांडाचा उलगडा झाला असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातून एका आरोपीला अटक केली आहे.