Pune: बाबासाहेबांच्या स्वप्नातील शिवसृष्टीच्या लोकार्पणासाठी अमित शहा लावणार हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune: बाबासाहेबांच्या स्वप्नातील शिवसृष्टीच्या लोकार्पणासाठी अमित शहा लावणार हजेरी

Babasaheb Purandare: बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी ऐतिहासिक पार्कच्या पहिल्या चरणाचा लोकार्पण सोहळा अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. शिवसृष्टीमध्ये पहिल्या चरणासाठी ७० कोटी रूपये खर्च केले. येत्या २० तारखेला हा सोहळा आंबेगाव येते पार पडणार आहे.

हेही वाचा- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हेही वाचा: Bharat Jodo : मोहन भागवत मशिदीत चालले, काही दिवसांनी मोदी टोपी घालतील; काँग्रेसची खोचक टीका

पुण्याजवळील आंबेगाव या ठिकाणी 21 एकर जागेत शिवसृष्टी उभी करण्याचे काम चालू आहे. पद्मविभूषण, बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठे ऐतिहासिक पार्क असणार आहे. शिवचरित्राचा प्रसार आणि प्रचार या उद्देशाने सुरू झालेले शिवसृष्टी निर्मितीचे काम आधुनिक पध्दतीने आणि वास्तुरूपाने साकार करण्यात येत आहे.

हेही वाचा: प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधताय? मोहन भागवतांनी खडसावलं!

या कार्यक्रमासाठी भाजपचे जेष्ठ नेते, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील या हजेरी लावणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर पुढील काही महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुण्यातील शहा यांचा हा दौरा भाजपला ऊर्जा देणारा ठरू शकतो.

टॅग्स :Pune NewsAmit Shah