esakal | Pune: माझ्यासाठी काम करणाऱ्यांसाठी मी जीव तोडून काम करणार - डॉ. कोल्हे
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. कोल्हे

माझ्यासाठी काम करणाऱ्यांसाठी मी जीव तोडून काम करणार - डॉ. कोल्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोंढवा : लोकसभा निवडणूकीवेळी माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचं रानं केलं आहे. आता महापालिका ही त्यांची निवडणूक आहे, त्यांच्यासाठी मी जीव तोडून काम करणार असल्याचे मत शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. हडपसर विधानसभा मतदारसंघात जगदंब प्रतिष्ठानच्यावतीने मांजरी, महादेवनगर, कोंढवा या परिसरात ५० हजार लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. लसीकरण केंद्रास खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे यांनी भेटी दिल्या. यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघामधील कोंढवा(बु)मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.

यावेळी आमदार चेतन तुपे-पाटील, नगरसेविका संगीता ठोसर, संदिप बधे, राकेश कामठे, श्याम मरळ आदींसह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कोल्हे म्हणाले, 'शरद पवार यांनी केलेल्या नुकत्याच वक्तव्यानुसार केंद्र सरकार लोकांचे लक्ष विकेंद्रित करण्यासाठी इडी, सीबीआय या संस्थांचा गैरवापर करत आहे. या देशातील शेतकऱ्यांना चिरडले जात आहे. केंद्राच्या या धोरणाचा निषेध करावा तेवढा कमी असुन केंद्र सुडाचे राजकारण करत आहे.'

मी माझ्या राजकारणासाठी छत्रपती संभाजी आणि शिवाजीचा कधी वापर केला नसल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. तसेच, एक कार्यकर्ता म्हणून शरद पवार यांना पंतप्रधान आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त करणे गैर नसल्याचीही स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर शिरुर लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांसाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा आढावा त्यांनी यावेळी मांडला.

loading image
go to top