
Pune : महिलांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंचे भरविले प्रदर्शन
पुणे (मुंढवा) : मुंढवा पिंगळे वस्ती येथील आनंदी उद्योग समुहातर्फे दिवाळीनिमित्त महिलांनी स्वतः तयार केलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. त्याचे उदघाटन समता परिषद पुणे शहराध्यक्षा वैष्णवी सातव व किशोर धायरकर यांचे हस्ते करण्यात आले.
या शिबीराचे आयोजन आनंदी उद्योग समुहाच्या गौरी पिंगळे यांनी केले. याप्रसंगी पुष्पा भंडारी, रूपा भंडारी, लतिका नरके, सुरेखा लोखंडे, दिपाली रहाटे, विद्या घेवडे, भारती परदेशी, कोमल शहा यांनी घरी तयार केलेल्या विविध वस्तू प्रदर्शनात मांडल्या होत्या.
यामध्ये खरडा, लिंबू मिरची लोणचे, घरघुती पदार्थापासून तयार केलेल चेहऱ्यासाठीचे ग्लो लोशन, विविध रंगातील रांगोळी, शेंगदाणा चिक्की, विविधरंगी सजवलेली तोरणे, भेटवस्तू, ग्रिटींग कार्ड, होममेड चॉकलेट, नक्षीकाम केलेल्या पर्स, या वस्तूचा समावेश होता. या प्रदर्शनास नगरसेविका पुजा कोद्रे, सागर भंडारी, नवनाथ कोद्रे, अक्षय पिंगळे, वैशाली कांबळे यांनी भेट दिली.
Web Title: Pune An Exhibition Filled With Items Made By Women Themselves
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..