Pune News : पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे तुर्तास तरी विलिनीकरण शक्य नाही

देशभरातील २३ कॅन्टोन्मेंट बोर्डांचे पहिल्या टप्प्यात तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे.
Pune Cantonment Board
Pune Cantonment Boardsakal

कँटोन्मेंट - देशभरातील २३ कॅन्टोन्मेंट बोर्डांचे पहिल्या टप्प्यात तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. मात्र, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या कॅन्टोन्मेंट बोर्डांबाबत अद्यापही केंद्र सरकारने कोणताच निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे इतक्यात महापालिकांमध्ये विलिनीकरण होणार नाही.

मात्र, पहिल्या टप्प्यात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलिनीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेत अर्थात जवळच्या महापालिकेत करण्याचे सूतोवाच कॅन्टोन्मेंट बोर्डांतील अधिकारी,कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

देशभरात एकूण ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विलिनीकरणासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये राज्य सरकारचा प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे. या समितीमार्फत सध्या कोणकोणत्या कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलिनीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेत करायचे आहे. यासंबंधी विचारविनिमय सुरू आहे.

या समितीच्या शिफारसीनंतरच सुरवातील आकाराने कमी क्षेत्रफळ असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डांचे टप्प्या टप्प्याने विलिनीकरण करण्यात येईल. देशभरातील६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी २३ कॅन्टोन्मेंट बोर्डांचे क्षेत्रफळ ऊर्वरित कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या तुलनेत कमी आहे.

तसेच या २३ कॅन्टोन्मेंट बोर्डांतील बहुतांश जागा खासगी मालकीच्या आहेत. त्या ठिकाणी लष्कराच्या आस्थापनांची संख्या कमी आहे. त्यामुळे तेथील विलिनीकरण करणे सोईचे आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात २३ कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलीनीकऱण तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेत(महापालिका) होऊ शकते.

केंद्र सरकारने नेेमलेल्या समितीने अद्यापही पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांशी विलिनीकरणाबाबत काहीही संपर्क साधलेला नाही. कारण देशभरातील मोठ्या कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये पुणे, खडकी, लखनौ, दिल्ली, जबलपूर, महू, जालंधर, चेन्नई या कॅन्टोन्मेंट बोर्डांचा समावेश होतो.

या ठिकाणच्या कॅन्टोन्मेंट बोर्डांशी संरक्षण मंत्रालयाच्या समितीने अद्याप तरी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे सध्या तरी या मोठ्या कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलिनीकरण तेथील महापालिकांमध्ये होणार नसल्याचेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी सांगत आहेत.

पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये लष्करी आस्थापनांची संख्या जास्त असून, त्यांच्या ताब्यातही तेथील जागा आणि रस्ते आहेत. या दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलिनीकरण झाल्यास, तेथील रहिवासी नागरिकांच्या सामाजिक हक्कांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्यातरीही पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलिनीकरण शक्य नसल्याचेच अधिकारी आणि कर्मचारी सांगत आहेत.

- देशभरातील मोठ्या क्षेत्रफळाच्या कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलिनीकरणाबाबत अनेक अडचणी

- कमी क्षेत्रफळांच्या कॅन्टोन्मेंट बोर्डांत बहुतांश जमिनी खासगी मालकांच्या असल्याने विलिनीकरण शक्य

- पहिल्या टप्प्यात कमी क्षेत्रफळांच्या २३ कॅन्टोन्मेंट बोर्डांचेच विलिनीकरण शक्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com