
Andekar gang Pune crime history
esakal
पुणे एकीकडे संस्कृती, शिक्षण आणि प्रगतीसाठी प्रसिद्ध असलेले शहर… पण या चकचकीत प्रतिमेच्या आड लपलेली आहे गुन्हेगारीची काळी छाया... मागील चार दशकांपासून शहराच्या मध्यवर्ती भागात भीतीचं साम्राज्य उभारणाऱ्या एका कुख्यात टोळीचं नाव म्हणजे आंदेकर कुटुंब... भांड्यांच्या व्यवसायातून सुरू झालेला त्यांचा प्रवास हळूहळू पोहोचला दहशत खून आणि राजकारणात. नुकताच घडलेला वनराज आंदेकर आणि त्याचा भाचा आयुष कोमकर यांच्या खुनाचा थरारक प्रसंग या टोळीच्या काळ्या दुनियेचं गूढ पुन्हा एकदा शहरभर चर्चेत घेऊन आला आहे. त्यामुळे आंदेकर टोळीचा पडद्यामागचा काळा इतिहास वाचायला हवा.