Pune : कर्मयोगी कारखाना पंचवार्षीक निवडणूकीचे बिगुल वाजलं

दि. २२ सप्टेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार
indapur
indapursakal

बिजवडी ( ता. इंदापूर ): येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखरकारखाना पंचवार्षीक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि.२२ सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.कारखान्यावर माजी सहकार मंत्री तथा भाजपा नेतेहर्षवर्धन पाटील, कारखान्याचे दिवंगतसंस्थापकअध्यक्ष शंकरराव पाटील यांची कन्या तथा उपाध्यक्ष श्रीमती पद्माताई भोसले यांची सत्ता आहे. या निवडणूकीत राज्याचे सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे पॅनेल टाकणार की भवानीनगर कारखान्याची निवडणूक लक्षात घेता कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे चे सचिव यशवंत गिरी यांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार नामनिर्देशन अर्ज दाखलकरण्यास दि.२२ सप्टेंबर पासून सुरवात होणार असून दि.२४ हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय इंदापूर तहसील येथे अर्ज दाखल करतायेणार आहेत. दाखल अर्जाची छाननी प्रक्रिया दि. २७ सप्टेंबर रोजी पार पडणार असून दि. २८ सप्टेंबर रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. दि.२८ सप्टेंबर पासून दि. १२ आँक्टोबर पर्यंत उमेदवारास अर्ज मागे घेता येणार असून दि.१३ आँक्टोबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप होणार आहे.

मतदान प्रक्रिया दि.२० आँक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ या वेळेत पार पडणार असून मतदान मोजणी दि.२२ आँक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होवून अंतिम निकाल जाहीर होणार आहे. इंदापूर, कालठण,पळसदेव,भिगवण, शेळगाव या पाच गटामधून प्रत्येकी३संचालक व भटक्या जमाती प्रवर्ग १, मागास प्रवर्ग १,अनुसुचित जमाती १,महिला राखीव २ आणि ब वर्ग १ असे एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

indapur
Pune : निरवांगीमध्ये चाेरट्यांचा धुमाकुळ

कर्मयोगी कारखान्याची ऊस वाहतूक जवळची असून उपपदार्थ निर्मिती असलेला हा साखर कारखाना आहे. स्थापने पासून संस्थापक स्व. शंकरराव पाटील किंवा त्यांच्या घराण्या कडे निर्विवाद सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कारखान्याचे नेतृत्व आहे.गेली ३२ वर्षांपासून कारखान्यामुळे तालुक्यातील ५८ गावांतील शेतकऱ्यांचे आर्थिक परिवर्तन झाले मात्र गत हंगामात साखर उत्पादन खर्च वाढला तर साखरेचे बाजारभाव कमी झाले. त्यामुळे कारखान्यासमोरील अडचणी वाढल्या असून एफआरपी देताना मोठी कसरत करावीलागत आहे.

त्यामुळे सभासदांमध्ये थोडी नाराजी आहे मात्र त्याचे रूपांतर सत्तांतरात होईल का याची चर्चा आहे. या निवडणूकीत श्री. पाटील यांना संपूर्ण राजकीय कौशल्य पणास लावावे लागणार आहे. त्यातच कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकूळदास शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, कार खाना संचालक भरत शहा तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील नाराजी सुसंवादा अभावी अद्याप कमी झाली नाही.

त्यांच्या नाराजीचा फायदा घेता येईल का याची चाच पणी राष्ट्रवादी कडून सुरू आहे.आगामी सर्व निवडणूका या मिनी आमदारकीच्या असल्याने कोट्यावधी रुपयांचा तालुक्यासाठी फंड आणणारे मंत्री दत्तात्रय भरणे तसेच अनेक सहकारी संस्था ताब्यात असलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीतील दोघांच्या भूमिकेकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com