Pune : पुण्यात आणखी एका अमेरिकन कंपनीने आपली विकास क्षमता वाढविली

आपल्या पुणे येथील इनोव्हेशन आणि डेव्हलपमेंट सेंटरची क्षमता वाढविली.
Technically competent
Technically competentsakal

पुणे : १० फेब्रुवारी २०२३, रोजी स्कोप रिटेल सिस्टम्स, एक अमेरिकन कन्सल्टन्सी आणि सप्लाय चेन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी, यांनी आपल्या पुणे येथील इनोव्हेशन आणि डेव्हलपमेंट सेंटरची क्षमता वाढविली. स्कोप रिटेल सिस्टीम्सची उपकंपनी असलेली स्कोपसिस इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड आता अमर बिझनेस झोन, बाणेर, पुणे येथील त्यांच्या नवीन कार्यालयातून काम करणार आहे.

"महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या आणण्यासाठी मुंबई, नाशिक आणि पुणे येथील आमची टीम वाढविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. १०० हून अधिक मेहनती आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम (technically competent) सहकाऱ्यांना ठेवण्याची क्षमता असलेले नवीन केंद्र सुरू करण्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे." स्कोप रिटेल सिस्टीम्सचे सीईओ महेश प्रधान यांनी सांगितले.

स्कोपसिस इनोव्हेशनचे टेक्नॉलॉजी संचालक
स्कोपसिस इनोव्हेशनचे टेक्नॉलॉजी संचालकsakal

"आमची स्कोपसिस इनोव्हेशन टीम दर्जेदार उत्पादने आणि सेवां ग्राहकांना देण्यासाठी वचनबद्ध आहे. आमच्या मंडळाने अमेरिकेत आणि भारतात कंपनीच्या वाढीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेंटनव्हिल येथील कार्यालयासह, पुण्यातील नवीन कार्यालयामुळे आम्हाला एकात्मिक विकास आणि नाविन्यपूर्ण सेवा नेटवर्क तयार करणे आणि आमची क्षमता अधिक बळकट करणे शक्य होईल" असे स्कोप रिटेल सिस्टम्सचे सीटीओ संदेश रामनाथकर यांनी सांगितले.

"आमची टीम इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स आणण्यासाठी आमच्या अमेरिकन सहकारी कंपनी आणि काही फॉर्च्युन १०० अमेरिकन ग्राहकांबरोबर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अत्यंत यशस्वीरीत्या कार्यरत आहे. नवीन कार्यालय आम्हाला आमची क्षमता वाढविण्यास, अधिक उत्पादने वेगाने वितरित करण्यास मदत करेल. या सर्व गोष्टींमुळे टीम खूप उत्तेजित आहे" असे स्कोपसिस इनोव्हेशनचे टेक्नॉलॉजी संचालक अमित पेटकर यांनी सांगितले.


०९ फेब्रुवारी २०२१ साली ४ सहकार्यांसोबत चालू झालेल्या स्कोपसिस इनोव्हेशन कंपनीची क्षमता आता जवळ जवळ‌ १० पटीने वाढली आहे. तांत्रिक दृष्ट्या सक्षम सहयोगी आणि उत्तम उत्पादन क्षमता ह्यामुळे ह्या कालावधीत विदेशी चलनाची आवक भारतात करण्यासाठी ह्या कंपनीने चांगला हातभार लावला आहे.

स्कोप रिटेल सिस्टीमबद्दल अधिक माहितीसाठी www.scoperetail.com.
स्कोपरिटेलबद्दल® २०१८ मध्ये बेंटनव्हिल, अर्कान्सास, युएसए, येथे स्थापित मुख्यालय भारत, मेक्सिको आणि यूएसए मध्ये कार्यरत आहे. स्कोप रिटेल सिस्टीमची स्थापना ओपन इंटिग्रेशन प्लॅटफॉर्मसह मॉड्युलर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या तत्त्वज्ञानासह "एक्सेलेरेटिंग पॉसिबिलिटीज फॉर एंटरप्राइजेस विथ डिजिटल इनोव्हेशन" या मिशनसह करण्यात आली आहे.


आपण www.scoperetail.com वेबवर स्कोप रिटेल्सची सॉफ्टवेअर लाइन, क्लायंट, भागीदार, पुनर्विक्रेता माहिती आणि सेवा शोधू शकता.स्कोपरिटेल® हा स्कोप रिटेल सिस्टम्स, यूएसए, चा ट्रेडमार्क आहे.

तुषार अग्रवाल / संदेश रामनाथकर / महेश प्रधान
फोन नं: +1 (866) 972-6719
ई मेल: info@scoperetail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com