Pune : चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune anti corruption department

Pune : चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पुणे : नातेवाईकावर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच घेणारे चतु:शृंगी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले. हि कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली.

पोलिस हवालदार प्रशांत जाधव व पोलिस शिपाई अजित गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. जाधव व गायकवाड हे दोघेही चतु:शृंगी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान, तक्रारदाराच्या आतेभावावर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दोघांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

त्यानंतर त्यांच्यात तडजोडी झाल्यानंतर २५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, रविवारी सायंकाळी दोन्ही पोलिसांनी रक्कम घेऊन तक्रारदारास बोलावले होते. मात्र तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

त्यानुसार, रविवारी सायंकाळी चतु: शृंगी पोलिस ठाण्यात सापळा लावून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना २५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. दोघांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.