Pune Equal Water Supply: पाणीटंचाई मुक्तीसाठी अजून गरज ५२ टाक्यांची; मे २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार
Equal Water Supply Scheme in Pune: Overview: पुण्यातील समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ८२ टाक्यांपैकी ६७ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून, ३० टाक्यांमधून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित ५२ टाक्यांचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे शहरातील पाणीटंचाई कमी होईल.
पुणे : पाणीटंचाईमुळे कायम तहानलेल्या भागांत नागरिकांचा रोष प्रशासनाला सहन करावा लागत होता. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेतून गेल्या वर्षभरात महापालिकेने १५ टाक्यांचे काम पूर्ण करून त्यातून जलवितरण सुरू केले.