Glasgow CWG 2026 Army Medals: ग्लासगो राष्ट्रकुल २०२६ मध्ये भारतीय लष्कराची सुवर्णझेप; ३९ पैकी १६ पदके आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या शिलेदारांच्या नावावर

पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमधून घडलेले लष्करी खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत १६ पदकांसह भारताच्या कामगिरीचा कणा; बॉक्सिंगसह ज्युदो, ॲथलेटिक्स, पॅरा शॉटपुट व वेटलिफ्टिंगमध्ये ऐतिहासिक सुवर्ण-रौप्य विक्रम
Pune's Army Sports Institute emerged as India's medal powerhouse at the 2026 Commonwealth Games, with Indian Army athletes winning 16 of India's 39 medals, including a dominant performance in boxing.

Pune's Army Sports Institute emerged as India's medal powerhouse at the 2026 Commonwealth Games, with Indian Army athletes winning 16 of India's 39 medals, including a dominant performance in boxing.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने जिंकलेल्या एकूण ३९ पदकांपैकी तब्बल १६ पदके (४१ टक्के) एकट्या भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी पटकावली आहेत. या दैदीप्यमान यशाच्या केंद्रस्थानी पुण्यातील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ (एएसआय) आहे. विशेष म्हणजे देशाच्या बॉक्सिंग मोहिमेतील बहुतांश सुवर्णपदक विजेते खेळाडू ‘एएसआय’मध्ये घडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com