Pune : मार्केट यार्डात हंगामपूर्व द्राक्षांची आवक

अवकाळी पावसाचा परिणाम; १० किलोस ३०० ते ५०० रुपये भाव
Pune news
Pune newsesakal

पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात आंबट-गोड द्राक्षांची हंगामपूर्व आवक सुरू झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षांची काढणी सुरू केली आहे. अवकाळी पावसात सापडलेल्या द्राक्षांना १० किलोस ३०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. बाजारात दिवसाआड चार ते साडेचार टन द्राक्षांची आवक सध्या होत आहे.

Pune news
Parenting Tips : वर्षाच्या आतील बाळाला साखर-मीठ का देऊ नये?

पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर भागातून पंढरपूर, सांगोला येथून हंगामपूर्व द्राक्षांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सध्या सुरू झाली आहे. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत द्राक्षांचा हंगाम सुरू असतो. उन्हाळ्यात द्राक्षांची गोडी असे मार्केट यार्डातील द्राक्ष व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

Pune news
Hair Care Tips : केसातला कोंडा कायमचाच घालवेल मुगाची डाळ? कशी वापरायची ते पहा

घाऊक बाजारातील १० किलोंचे भाव

सोनका - ६०० ते ११००

तास-ए-गणेश - ५०० ते ७००

जम्बो व्हरायटीज - ८०० ते १२००

Pune news
Gardening Tips : झाडांची पाने पिवळी का पडतात? असू शकतात 'ही' कारणे

अशी आहे स्थिती

बाजारात आवक झालेली द्राक्षे सोनाका आणि तास-ए-गणेश जातीची

नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील द्राक्षांना बसला

फटका बसलेल्या द्राक्षांची प्रतवारी मध्यम

किरकोळ बाजारात द्राक्षांना फारशी मागणी नाही

Pune news
Makeup Tips : हिवाळ्यातला मेकअप म्हणजे चेहऱ्याला पिठ लावल्यासारखंच दिसतं? या स्टेप्सनी मिळवा मेकअपचा खरा ग्लो!

कोठून आहे मागणी

पुण्यातील फळ बाजारातून पर्यटनस्थळावर द्राक्षे विक्रीस पाठविली जातात. महाबळेश्वर, लोणावळा, कोकणातून फळ विक्रेत्यांकडून द्राक्षांना चांगली मागणी आहे. परराज्यातून गुजरातमधील बडोदा, अहमदाबाद, सूरत तसेच गोव्यात द्राक्षे विक्रीस पाठविण्यात येत आहेत.

यंदा द्राक्षांची लागवड चांगली झाली असून हंगामात द्राक्षांची आवक मुबलक प्रमाणावर होईल. हंगाम सुरू होण्यास आणखी एक ते सव्वा महिन्यांचा कालावधी आहे. द्राक्षांचा हंगाम जानेवारी ते मे महिन्यांपर्यंत सुरू असतो. हंगाम सुरू झाल्यानंतर द्राक्षांची आवक टप्प्याटप्प्याने वाढून ५० टनांपर्यंत पोहचते. अवकाळी पावसाचा मोठा फटका द्राक्षांना बसला आहे.

- अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com