

Ashish Shelar Slams Opposition on Vande Mataram
Sakal
पुणे : ‘‘संविधानाने राष्ट्रगीत मानलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीचे कार्यक्रम देशभरात साजरे होत आहेत. मात्र संविधानाविषयी गैरसमज पसरवणारे काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे या कार्यक्रमात सहभागी का होत नाहीत’’, असा प्रश्न सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला. ‘राहुल गांधी हे ‘झूठ की दुकान’ आहेत’, अशी टीकाही त्यांनी केली.