
पुणे : अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याला 3 जूनपर्यंत ATS कोठडी
पुणे : अतिरेकी संघटनाना अर्थपुरवठा (टेरर फंडिंग) करण्याच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातून अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याला विशेष न्यायालयाने ३ जूनपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. जुनैद मोहम्मद असे महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. "लष्कर ए तैयाबा" या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून जुनैदला अटक करण्यात आली आहे. जुनैद हा फेसबुकवरून तीन जणांच्या संपर्कात होता, अशी माहितीदेखील एटीसकडून न्यायालयाला देण्यात आली आहे. याशिवाय जुनैद दोन वर्षात 6 वेळा काश्मीरला गेल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जुनैदला झालेल्या फडिंगमधून त्याने काही शस्त्रे खरेदीसाठी किंवा भरती केलेल्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी केल्याचा संशय एटीएसला आहे. (Pune Terrorist Connection News Updates)
मोहम्मद हा समाजमध्यमाद्वारे काश्मीरमधील "गझवाते अल हिंद" या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. एक महिन्यापूर्वी त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते. दरम्यान, तो या संघटनेच्या अधिक संपर्कात येत असल्याची माहिती पुणे "एटीएस"ला मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी दुपारपासून त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर तो चौकशीत दोषी आढळल्याने त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. मोहम्मद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी असून, मागील दीड वर्षांपासून तो पुण्यात राहत होता. त्याचे शिक्षण मदरशात झालेलं आहे.
हेही वाचा: राज्यसभेच्या जागेचा चॅप्टर बंद, लवकरच अधिकृत घोषणा: राऊत
जुनैदच्या वकिलांनी काय सांगितलं?
याबाबत जुनैदच्या वकिलांनी सांगितले की, जुनैदने वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबासाठी रिक्रुटमेंट तसेच त्यासाठी फंडिग गोळा करणे, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांची रेकी करायची असे काम जुनैदला देण्यात आले होते. ज्या ठिकाणची रेकी करण्यात आली तेया ठिकाणी काही हल्ल्याचा कट होता का? याची चौकशी पोलिसांना करायची आहे.
जुनैदचे शिक्षण मदरशात झाले असून, तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरलेला असल्याचेही वकिलांनी सांगितले. त्यामुळे तो नेमका कुठे राहत होता तसेच त्याने कुणाला रिक्रूट केले आहे का? त्याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकं भरती करण्याचा प्रयत्न झाला आहे का? या सर्वाची चौकशी एटीएसला करायची असल्याने त्याला एसटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Web Title: Pune Ats Arrest Suspected Terrorist Court Sent Him To Ats Custody Till 3 June
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..