पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Pune Crime News पुण्यात तरुणींनी एका १९ वर्षीय तरुणावर पहाटे चारच्या सुमारास कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Pune Crime: Early Morning Sickle Attack on 19-Year-Old Captured on CCTV

Pune Crime: Early Morning Sickle Attack on 19-Year-Old Captured on CCTV

Esakal

Updated on

पुण्यात फ्लाईंग जिप्सी हॉटेलमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास एका तरुणावर कोयत्यानं हल्ला झाल्याची घटना घडलीय. रील बनवण्याच्या आणि कमेंटच्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. या हल्ल्यात अथर्व जगताप नावाचा १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या फ्लाईंग जिप्सी हॉटेलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी दोन तरुणींसह तीन संशयितांची ओळख पटवण्यात आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com