

Theft of Schedule-H Drug at Aundh Hospital
Sakal
पुणे : औंध जिल्हा रुग्णालयाच्या औषध भांडार विभागातून मेफेंटर्माइन सल्फेटच्या २० बाटल्या (व्हायल्स) चोरीला गेल्याची घटना समोर आली. त्यानंतर सरकारी औषध साठ्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात औषध चोरल्याप्रकरणी वर्ग चारच्या कर्मचाऱ्याला निलंबित केले असून, मेफेंटर्माइन औषधांची आकडेवारी पडताळून अहवाल सादर करा, असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाला दिले आहेत.