esakal | पश्चिम बंगालमध्ये वाढले मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण; पुण्यातल्या अधिकाऱ्याची कमाल!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune authorities increase school attendance rate for girls in West Bengal

संजय‌ थाडे असे या अधिकाऱ्याचे‌ नाव. ते  मूळचे पुण्याचे. पण भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची कर्मभूमी झाली वंगभूमी. मराठी आई होती. त्याबरोबर बंगाली भाषा आत्मसात केली आणि कर्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी या माणसाने प्रचंड कष्ट उपसले. अनेक विकास योजना बंगालमध्ये राबविल्या. 

पश्चिम बंगालमध्ये वाढले मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण; पुण्यातल्या अधिकाऱ्याची कमाल!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : भारतात शाळेतूून मुलींची‌ गळती ही समस्या गंभीर आहे़. पण ही गळती रोखली एका मराठी अधिकाऱ्याने. पण कुठे?... तर पश्चिम बंगालमध्ये. विशेष म्हणजे गळती शून्य होण्याबरोबरच आता मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण बारा टक्क्याने वाढले आहे. एका मराठी  अधिकाऱ्याच्या कर्तव्य दक्षतेमुळे 85 लाख विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी मोफत सायकली मिळाल्या. याबद्दल या मराठी अधिकाऱ्याचा सन्मान आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला आहे. 

संजय‌ थाडे असे या अधिकाऱ्याचे‌ नाव. ते  मूळचे पुण्याचे. पण भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची कर्मभूमी झाली वंगभूमी. मराठी आई होती. त्याबरोबर बंगाली भाषा आत्मसात केली आणि कर्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी या माणसाने प्रचंड कष्ट उपसले. अनेक विकास योजना बंगालमध्ये राबविल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पश्चिम बंगालमध्ये सरकारी, अनुदानित शाळांमध्ये मुलींची गळती हा मुद्दा त्यावेळी समोर आला. मुख्यमंत्री ममता‌ बॅनर्जी यांनी त्याची दखल घेतली आणि एक योजना आखली. थाडे हे मागासवर्गीय मंत्रालयाचे प्रधान सचिव होते. त्यांनी  या योजनेला अाकार दिला आणि तब्बल 85 लाख विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायकली मिळाल्या. 'सबूज साथी' अर्थात हरित साथी या योजनेद्वारे हे यश सरकारला मिळवून दिले.

थाडे‌ हे सध्या पुण्यात आले आहेत. 'सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी या योजनेची सुरवात आणि संयुक्त‌ राष्ट्र संघाचे पारितोषिक असा प्रवास त्यांनी विषद केला. ते म्हणाले, "विद्यार्थिनींची गळती, हायस्कूलचे प्रमाण कमी, पाच-सहा किलोमीटर अंतरावरील शाळा आणि मुलींना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे अधिक प्रमाण या समस्या सरकारपुढे होत्या. त्यावर उपायांचा विचार करताना सायकल वितरण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला."

'सबूज‌ साथी' योजना राबविताना सर्व विद्यार्थ्यांचा विचार केला. यात कोणताही धर्म, जात, लिंग याचा‌ विचार केला नाही. नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना लाभार्थी करण्यात‌ आले. सचोटीने ही योजना मी राबविली. टेंडर प्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन केली. कोणत्या विद्यार्थ्याला सायकल दिली, हे समजण्यासाठी प्रत्येक‌ सायकलवर 'मशीन रिडेबल टॅजेन्ट कोड' लावले. त्यामुळे पारदर्शीपणा आला. आमच्या यशाचे गमक‌ हेच आहे, असे थाडे यांनी स्पष्ट‌ केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जीनिव्हातील वर्ल्ड समिट ऑन इन्फॉर्मेशन सोसायटी ही संयुक्त राष्ट्र संघ (यूनो), जागतिक व्यापार संघटना अशा विविध संस्थांमधील अधिकाऱ्यांची संघटना आहे. त्यांनी 160 देशांतून मागावलेल्या आठशे प्रकल्पांमधून 'सबूज साथी'ची जागतिक स्तरावल प्रथम‌ क्रमांकासाठी निवड झाली. संजय‌ थाडे‌ यांना पारितोषिक ऑनलाइन पद्धतीने देेण्यात आले. सरकारी कामकाजामध्ये आयसीटीचा‌ वापर (इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी) या श्रेणीत‌ हे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ई गव्हर्नन्स आणि कॉम्प्युटर सोसायटीचाही पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

''नोबेल‌ विजेते‌ अमर्त्य सेन यांच्या संस्थेकडून‌ योजनेचे   यशापयश जोखले. त्यात‌ पहिल्या वर्षी दहावी-बारावी‌ परीक्षेसाठी मुलींची नोंदणी बारा टक्क्यांनी वाढली, त्यात‌ दरवर्षी पाच‌ टक्क्यांनी भर पडत‌ राहिली. विद्यार्थी-विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे‌ प्रमाण वाढले. आता आयआयएम रांची आणि कोलकतामधील प्राध्यापक या योजनेचा अभ्यास (केस स्टडी) करीत आहेत.''
- संजय‌ थाडे (प्रधान सचिव, पश्चिम बंगाल)

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण

loading image