Pune Auto Rickshaw : पुणेकरांना मोठा दिलासा! अखेर रिक्षा चालकांचा संप मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune auto rickshaw drivers strike has been called off bike taxi driver pune News

Pune Auto Rickshaw : पुणेकरांना मोठा दिलासा! अखेर रिक्षा चालकांचा संप मागे

पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पुकारण्यात आलेला रिक्षा चालकांचा संप संध्याकाळी मागे घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार असून, बेकायदा टॅक्सी चालकांवर कारवाई होणार आहे.

‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांसमोर आज याबद्दल घोषणा केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर येत्या १० दिवसात पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात येईल. या समितीत जिल्हाधिकारी यांच्यासह आरटीओचे अधिकारी तसेच ट्रॅफिक पोलिस विभागाचे अधिकारी असतील. या समितीकडून येत्या १० दिवसात बेकायदा बाईक टॅक्सीवर कडक कारवाई केली जाईल.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

हेही वाचा: Udayanraje Bhosale : डोळे पाणावल्यानं उदयनराजे हतबल? खासदारकी सोडण्याबाबत केलं महत्वाचं विधान

येत्या १० दिवसात बेकायदा टॅक्सी चालकांवर कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर शेकडो रिक्षा चालकांनी चक्का जाम आंदोलन केले होते. शहरातील काही भागात या संपत सहभागी न होणाऱ्या रिक्षांवर दगडफेक देखील करण्यात आली होती.

हेही वाचा: Delhi Crime News : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न, घटनेचा Video आला समोर

टॅग्स :Pune News