Udayanraje Bhosale : डोळे पाणावल्यानं उदयनराजे हतबल? खासदारकी सोडण्याबाबत केलं महत्वाचं विधान

mp udayanraje Bhosale on resignation over chhatrapati shivaji Maharaj Controversy bhagat singh koshyari
mp udayanraje Bhosale on resignation over chhatrapati shivaji Maharaj Controversy bhagat singh koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यादरम्यान प्रवक्त्याच्या वक्तव्यानंतर भाजपकडून शिवरायांचा अपमान झाल्याचं नाकारण्यात आलं होतं. दरम्यान आज या प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली, यादरम्यान ते भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

डोळ्यात अश्रू ही हतबलता समजायची का?

तुमच्या डोळ्यात आता अश्रू आले होते, ही तुमची हतबलता समजायची का, की तुम्ही अश्रु गाळता असा प्रश्न उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, तसं समजा.. माझा उलटं तुम्हाला प्रश्न आहे, भावना फक्त तुम्हाला दिल्या आहेत का? आम्हाला नाहीयेत का? हे काय मगरीचे अश्रू होते का? असे उदयनराजे यावेळी म्हणाले.

फडणवीस राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांचं समर्थन करतात यावर प्रतिक्रिया विचारली असता, उदयनराजे म्हणाले की, मी जे बोलायचं होतं ते बोललो. त्यांचं समर्थन मी तरी केलं नाही. कुठला पक्ष या लोकांविरोधात भूमिका घेत नसेल तर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊच नका, असेही उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

उदयनराजे खासदारकीचा राजीनामा देणार?

राज्यपालांना पदमुक्त केलं गेलं नाही तर तुमच्या खासदारकीचा राजीनामा देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, ती त्या वेळची गोष्ट आहे, काय होईल काय नाही होणार ते पाहून मी त्यावेळी निर्णय घेईल. माझी भूमिका मी बदलत नाही. कुठल्याही राजकारणासाठी मी त्यापासून फारकत घेणार नाही, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.

तसेच, तीन डिसेंबर रोजी राडगडावर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती देखील उदयनराजे यांनी यावेळी दिली. रायगडावर जाऊन लोकांच्या भावना व्यक्त करणार असे ते म्हणाले आहेत.

mp udayanraje Bhosale on resignation over chhatrapati shivaji Maharaj Controversy bhagat singh koshyari
Veer Savarkar : 'सावरकरांवर बोलयाची लायकी आहे का...'; राज ठाकरेंचा राहुल गांधींना संतप्त सवाल

दरम्यान या प्रकरणी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांची भेट घेणार असून ते प्रोटोकॉल प्रमाणे ते कारवाई करतील. त्यांनी असं वक्तव्य केलं हे दुर्दैवी आहे. यानंतर कारवाई झाली नाही तर लोकांनी पुढं ठरवावं की कोणाबरोबर राहायचं किंवा नाही राहायचं असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. तीन तारखेनंतर मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट घेणार आहे आणि त्यानंतर काय होतंय त्यावर मी नंतर बोलीन असे उदयनराजे म्हणाले.

mp udayanraje Bhosale on resignation over chhatrapati shivaji Maharaj Controversy bhagat singh koshyari
"एका दिशाभ्रम आणि बुद्धीभ्रम झालेल्या…"; राज ठाकरेंच्या राहुल गांधींवरील टीकेला कॉंग्रेसचं प्रत्युत्तर

राजकीय स्वार्थासाठी शिवरायांचा वापर केला जात आहे. असा आरोप उदयनराजे यांनी यावेळी केला. महाराजांबद्दल गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते तेव्हा राग कसा काय येत नाही. आता जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. विकृतीकरण थांबवलं नाही तर नव्या पिढीसमोर कोणता इतिहास मांडणार असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला.

शिवरायांचा अपमान होताना सर्वपक्ष गप्प का? थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही. हे पाहण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं. शिवरायांचा अपमान होतो तेव्हा दुःख होते अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यापालांवर कारवाई का केली नाही अशी विचारणादेखील उदयान राजे यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com