Auto Rickshaw Fare Hike : पुण्यात रिक्षा प्रवास तीन रुपयांनी महागला; असे आहेत नवे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात रिक्षा प्रवास तीन रुपयांनी महागला; असे आहेत नवे दर

पुण्यात रिक्षा प्रवास तीन रुपयांनी महागला; असे आहेत नवे दर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाढत्या महागार्इमुळे हैराण असलेल्या सर्वसामान्यांना आता रिक्षा प्रवासाची देखील छळ बसणार आहे. तर रिक्षाचालकांना मात्र दिवाळीनंतर चांगले गिफ्ट मिळाले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) रिक्षा प्रवासासाठी नवीन दर जाहीर केले आहे. त्यात रिक्षा भाडे दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सहा वर्षानंतर पहिल्यांदा रिक्षा भाडेवाढ झाली आहे.

प्रवाशांना आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २१ रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ही दरवाढ २२ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.आरटीएने १४ ऑक्टोबरला रिक्षाची भाडेवाढ जाहीर केली होती. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी २० रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १३ रुपये मंजूर केले होते. आठ नोव्हेंबरपासून दरवाढ लागू होणार होती. मात्र, ही दरवाढ पुरेशी नसल्याची भूमिका रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली होती.

हेही वाचा: २६ नव्हे तर २७ नक्षलवाद्यांना कंठस्थान; शोधमोहीम सुरूच

दरवाढीचा फेरविचार करण्याची संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार ‘आरटीए’ने तीन नोव्हेंबरला दरवाढ तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आरटीएची बैठक झाली. त्यात दरवाढीचा निर्णय झाला, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली. भाडेवाढ झाल्याने रिक्षा चालकांना २२ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत मीटर कॅलिब्रेशन करून घेणे बंधनकारक असणार आहे. कॅलिब्रेशन केलेल्या रिक्षांनाच नवीन दरवाढ आकारावी लागणार आहे.

हेही वाचा: २६ नव्हे तर २७ नक्षलवाद्यांना कंठस्थान; शोधमोहीम सुरूच

पहिले किलोमीटर - सध्याचा भाडेदर - नवीन भाडेदर - वाढ (रुपयांमध्ये)

पहिल्या १.५ कि.मी.साठी किमान देय भाडे - १८ - २१ - ३

त्यापुढील प्रत्येक कि.मी.साठी देय भाडे - १२.३१ - १४ - १.६९

loading image
go to top