Pune : मतदान दुप्पट तरीही २७ टक्केच ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक

Pune : मतदान दुप्पट तरीही २७ टक्केच !

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी यंदा दुप्पट झाली, असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपवायची; की फक्त २६.८५ टक्केच मतदान झाले म्हणून अपयश मानायचे. अशी अवस्था विद्यापीठाच्या निवडणूक यंत्रणेची झाली असावी.

अधिसभेच्या निर्वाचित सदस्यांपैकी प्राचार्य आणि संस्थाचालक गटांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर पदवीधर गटाच्या १० जागांसाठी रविवारी मतदान झाले. पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथील ७१ मतदान केंद्रांवर ८८ हजार ९०० मतदारांपैकी फक्त २३ हजार ८६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील वर्षीपेक्षा यंदा मतदान दुप्पट झाल्याचे विद्यापीठाचे निवडणूक अधिकारी व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. पदवीधर असलेल्या सुशिक्षीतांची नोंदणी होऊनही मतदानाची टक्केवारी कायमच कमी राहणे चिंताजनक आहे.

टक्केवारी कमी राहण्याची कारणे...

- मतदारांमध्ये जागृतीचा अभाव

- उमेदवारांची आणि एकंदरीत निवडणूक प्रक्रियेबद्दल माहितीचा अभाव

- संस्थाचालक किंवा राजकीय वलयाच्या सांगण्यातून मतदानाची परंपरा

- अधिसभेचे मतदार आणि मतदान वाढविण्यासाठी रचनात्मक कार्यक्रमांचा अभाव

जिल्हा ः मतदार ः मतदान ः टक्केवारी

पुणे ः ४५,२०६ ः ११२२८ ः २४.८४

अहमदनगर ः २७,३९२ ः ६५८३ ः २४.०३

नाशिक ः १६,२८८ ः ६०४९ ः ३७.१४

दादर नगर हवेली ः १४ ः ६ ः ४२.८६

एकूण ः ८८,९०० ः २३८६६ ः २६.८५