esakal | Pune : कात्रजला शिक्षकांचा सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : कात्रजला शिक्षकांचा सन्मान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना महामारीमुळे आॅनलाइन शिक्षणपद्धती आली. परंतु, आज शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाले असून स्वत:चा बिझनेस वाढविण्यासाठी अनेक खासगी कंपन्या आणि खासगी क्लासेसचे पेव फुटले आहे. त्यामुळे अशा काळात शिक्षकांची भूमिका आणि जबाबदारी वाढली असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांनी व्यक्त केले.

पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ताकवले बोलत होते. कात्रज येथील माऊली गार्डन कार्यालयात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात शहरातील ५० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे (टीडीएफ) उपाध्यक्ष हनुमंत भोसले, राज्य कार्याध्यक्ष जी. के. थोरात, शरदचंद्र धारूरकर, प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत मोहोळ, शहर सचिव सुजित जगताप, नगरसेविका मनिषा कदम, अविनाश ताकवले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. शिवाजी कामथे यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र देवकर व सचिन दुर्गाडे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष थोरात यांनी आभार मानले.

loading image
go to top