

Bacchu Kadu's Ultimatum on Farm Loan Waiver
Sakal
पुणे : ‘चालू वर्षी झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आताच कर्जमाफी झाली असती तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसता. त्यामुळे पुन्हा ते वंचित राहिले असते, म्हणून ३० जूनची तारीख योग्य ठरणार आहे. परंतु सरकारने कर्जमाफी केली नाही तर एक जुलैला रेल्वे रोको करण्यात येईल’’, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी दिला.