

Pune Murder Case: Three Juveniles Arrested for Killing 17-Year-Old Boy
Esakal
पुण्यात मंगळवारी भरदिवसा तिघांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय. मयंक खराडे असं हत्या झालेल्या १७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. बाजीराव रोडवर तिन्ही आरोपींनी धारदार शस्त्राने मयंकवर वार केले. यानंतर मयंक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.