

Pedestrian Walkway Blocked on Balewadi High Street
Sakal
बालेवाडी : बालेवाडी हाय स्ट्रीट येथील पार्क ग्रँड्युअर सोसायटीसमोर सध्या पदपथाला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर जुने सिमेंटचे गट्टू काढून नवीन गट्टू बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व जुने गट्टू व राडारोडा काढून पदपथावर टाकल्याने पादचाऱ्यांना पदपथ वापरता येत नाही. त्यामुळे हा पदपथ त्वरित मोकळा करण्याची मागणी होत आहे.