

The Shift to the Virtual World
Sakal
पुणे : ‘‘पूर्वीची पिढी साहस, अद्भुत, रम्य अशा रंगात रंगलेली होती. सध्याची पिढी आभासी जगात रमलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुद्द्याकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. साहित्याच्या माध्यमातून मुलांना वास्तवतेची जाणीव कशी करून देता येईल, या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे,’’ असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.