esakal | Pune: बॅन्ड वादकांवर उपासमारीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : बॅन्ड वादकांवर उपासमारीची वेळ

पुणे : बॅन्ड वादकांवर उपासमारीची वेळ

sakal_logo
By
समाधान काटे

शिवाजीनगर : बॅन्ड वादनाचा वडिलोपार्जित व्यवसाय १९४५ पासून सुरू आहे.कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून हा व्यवसाय बंद झाल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले. वर्षानुवर्ष थोडे- थोडे साठवलेले सगळे पैसे खर्च होत चालले.आमच्याकडे कामाला येणारे वादक, कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे 'भारत ब्रास बॅन्ड' मालक रविशंकर आगलावे सांगतात. सध्या आगलावे यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे.

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात जवळपास सव्वाशे बॅन्ड आहेत. कोरोना सुरू झाल्यापासून लग्नं,धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमावरती बंदी आली.तेव्हापासून आजतागायत बॅन्ड देखील बंद आहेत. प्रत्येक बॅन्ड मध्ये एकूण वीस ते पंचवीस कलाकार काम करत होते.जवळपास हजारो कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.चांगल्या कलाकारांचा 'कलाकार ते कामगार' असा प्रवास होत आहे. मोलमजुरी करणे, रिक्षा चालवने, भाजीपाला विक्री, खोदाई अशी कामे करून जीवन जगत आहेत.कोरोनाची परिस्थिती लवकरच कमी होईल आणि व्यवसाय पुन्हा पुर्ववत सुरू होतील या आशेवर जूने बॅन्ड धारक अजूनही तग धरून आहेत.या व्यवसायाला सरकारने मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

"बॅन्ड मध्ये पॅड, ढोल,ताशा वाजवणे, निवेदक अशी कामे करीत होतो

दोन वर्षापासून कोणतेही काम नसल्याने बदली ड्रायव्हर म्हणून सध्या काम करत आहे.मध्यांतरी फक्त एक वेळा किराणा साहित्य मिळाले,त्यानंतर शासनाची काही मदत मिळाली नाही. आमच्या बरोबर काम करणारे कालाकार देखील हाताला मिळेल ते काम करत आहेत".

-महेश कांबळे, वाद्य कलाकार येरवडा पुणे.

"सरकारने लादलेली बंधने हळूहळू कमी करावी. आमचा व्यवसाय पुर्ववत सुरळीत चालू होईल याकडे सरकारने लक्ष द्यावे. नाहीतर व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल. सरकारने निर्बंध शिथिल करावे".

- गिरीश आगलावे,मालक भारत ब्रास बॅन्ड, शनिवार पेठ पुणे.

"कोरोनामुळे दोन वर्षापासून सगळं बंद होतं. सध्या जवळपास ९९% व्यवसाय सुरू झाले आहेत. शासनाने आमचा देखील विचार करायला हवा आणि लग्न समारंभात वर्हाडी मंडळीत आम्हाला मोजू नये. बॅन्ड मधील कलाकारांना 'लोककलावंत' म्हणून शासनाने मानधन द्यावे.नवरात्र मध्ये किमान स्थिर वादनाची तरी परवानगी द्यावी".

- बाळासाहेब आढाव, अध्यक्ष बॅन्ड कला विकास प्रतिष्ठान (बॅन्ड मालक संघ) पुणे.

loading image
go to top