

Drainage Line Blockage Causes Stench on Baner-Pashan Link Road
Sakal
पाषाण : बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील सांडपाणी वाहिनी पुन्हा एकदा तुंबल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ जेट मशीनसह घटनास्थळी येत काही तासांतच सफाईची प्रक्रिया सुरू केली. मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या या सांडपाण्याच्या समस्येमुळे स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.