

Demand for Immediate Implementation of Advocate Protection Act
Sakal
पुणे : राज्यात वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व न्यायालयीन वकिलांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने मागे घेतला आहे. मात्र सोमवारी (ता. ३) येथील वकील लाल फीत लावून न्यायालयातील कामकाज करणार आहेत, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे (पीबीए) अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड यांनी दिली.