सायकलप्रेमींनो, पुणे ते बारामती स्पर्धेबाबत घेतलाय हा निर्णय

बंडू दातीर
Monday, 20 July 2020

उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित केली जाणारी पुणे ते बारामती ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा या वर्षी कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे

पौड : उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित केली जाणारी पुणे ते बारामती ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा या वर्षी कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी दिली.

 इंधन दरवाढीचा वेग सुसाट, डिझेलची दरवाढ सुरूच

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या सात वर्षापासून संस्थेच्यावतीने पुणे ते बारामती ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा घेतली जाते. तसेच, शनिवारवाडा ते हडपसरपर्यंत बेटी बचाव, प्लॅस्टिक बंदी, वृक्षसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्ती, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता अभियान, असे सामाजिक संदेश देणारी सायकल रॅलीही काढली जाते. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने संस्था ही स्पर्धा आयोजित केली जाते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या स्पर्धेत महाराष्ट्रासह तेरा राज्यातील राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय सायकलपटू, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कलाकार, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.  सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सामना करीत आहे. एकमेकाच्या संपर्कातून त्याचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून या वर्षीची सायकल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे, असे कदम यांनी सांगितले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार अॅड. मोहऩराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव आदी उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune to Baramati National Cycle Competition canceled