esakal | Pune: बारामती पोलिसांनी केला सराईत गुन्हेगार जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगार जेरबंद

बारामती पोलिसांनी केला सराईत गुन्हेगार जेरबंद

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : बारामती व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील विविध गंभीर गुन्ह्यातील एका फरार सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना आज यश आले. सुरज उर्फ माऊली सोमनाथ काशीद (रा. मेडद, ता.बारामती) हे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. बारामती तालुका पोलिस ठाणे, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या हद्दीत आरोपी काशीद याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल होते.

त्यामध्ये धारधार श्त्राच्या सहाय्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करून जखमी करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे आदी गंभीर पाच गुन्ह्यांचा समावेश आहे. परंतु गेली चार महिन्यांपासून संबंधित आरोपी काशिद फरार होता. मंगळवार (ता. ५) रोजी रात्रीच्यावेळी आरोपी काशिद हा आपल्या आई-वडीलांना मेडद येथे भेटण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांना लागली.

हेही वाचा: मोखाड्यात शिवसेना- राष्ट्रवादी आघाडी चे वर्चस्व

त्यानुसार त्यांनी तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडे वरील कामगिरी सोपवली आणि काशिद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या कामगिरीबाबत पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख,  अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे आदींनी  बारामती गुन्हे शोध पथकाचे अभिनंदन केल्याचे सांगण्यात आले.

loading image
go to top