Baramti News : विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2022-2023 या वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे.
Baramati vp clg
Baramati vp clg esakal
Updated on

बारामती- येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2022-2023 या वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 10 फेब्रुवारीला विद्यापीठाच्या वर्धापनदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडूनही महाविद्यालयास तारांकित महाविद्यालयाचा (स्टार कॉलेज स्टेटस) दर्जा देण्यात आला आहे.

महाविद्यालयास स्वच्छतेचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. अटल रँकिंगमध्येही महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध करून देशात पहिल्या 25 महाविद्यालयात स्थान मिळवले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात हे मानाचे पुरस्कार समजले जातात अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.

वर्धापन दिनानिमित्त गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत विद्यापीठाकडून दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यंदाच्या पुरस्कारासाठी महाविद्यालयाने विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार विद्यापीठाच्या समितीने जानेवारीत महाविद्यालयाची पाहणी केली. ग्रामीण विभागातून महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहिर झाला.

तीन लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या तारांकीत महाविद्यालयासाठी ही विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून तारांकीत महाविद्यालयाचे मानांकन मिळाले आहे. यातून महाविद्यालयातील प्राणिशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान विभागांना 1 कोटी 55 लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. याच विभागाकडून डीएसटी फिस्ट योजनेतून महाविद्यालयास 70 लाखांचे अनुदान मिळाले होते. रूसा अंतर्गत महाविद्यालयास 2 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

उपप्राचार्य डॉ शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, आयक्यूएसी समन्वयक निलिमा पेंढारकर, प्रा.निलीमादेवी, डॉ. जयश्री बागवडे डॉ. संजय खिलारे, नितीन सावंत आणि समितीतील इतर सर्व सदस्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट प्रस्तावामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे डॉ. भरत शिंदे यांनी नमूद केले.

विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाविद्यालयास हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, विठ्ठलदास मणियार, बाळासाहेब तावरे, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी प्राचार्य डॉ.भरत शिंदे व टीमचे अभिनंदन केले.

महाविद्यालयाची वाटचाल...

सन 1994 मध्ये 150 विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या महाविद्यालयात आज सहा हजारांहून अधिक विद्यार्थी अकरावी ते पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात एकूण 21 पीएच.डी. मार्गदर्शक असून 40 शिक्षक पीएच.डी. धारक आहेत. मागील तीन वर्षात त्यांनी 138 शोधनिबंध प्रकाशित केले असून त्यांना आठ पेटंट्सही मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com