

Pune Footpath Construction
esakal
वारजे: कर्वेनगरमधील नानासाहेब बराटे उड्डाणपुलाजवळ नागरिकांचा फारसा वावर नसलेल्या ठिकाणी पुणे महापालिकेकडून नवीन पदपथ बांधण्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी मोठ्या झाडांच्या मुळांची छाटणी केली जात असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत असून, हा पदपथ नेमका कोणासाठी, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.