
पुणे : अंजली गडोया झाली महाराष्ट्राची लावण्यवती
विश्रांतवाडी : महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येथील नीता राजदान कौल आणि ऑनलाइन लेडीज क्लब यांच्या संकल्पनेतून मराठी महिलांना जागतिक पातळीच्या सौंदर्यस्पर्धेचा सराव व्हावा आणि बहुमोल असे अनुभव मिळावे या करता महाराष्ट्राची लावण्यवती ही भव्य दिव्य सौंदर्यवती स्पर्धा खराडी येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत महाराष्ट्रातील शेकडो सौंदर्यवतींनी अस्सल महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान या स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या सौंदर्य व बौद्धिक कौशल्याची चुणूक दाखवली.
महाराष्ट्राची लावण्यवती 2022 (प्लॅटिनम)चे विजेते पद अंजली गडोया यांनी पटकवला तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे धनश्री मुळे व सविता कुमारी यांनी पटकावलायाबरोबरच गोल्ड आणि सिल्वर बहुमान प्रदान करण्यात आला.गोल्ड विजेतेपद प्रिया चंद्रात्रे यांनी पटकवला, तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे सोनाली हिंगे व हिलीमा यांनी पटकावला सिल्व्हर विजेते पद चिन्मयी गोकुळे यांनी पतकवला तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे नेहा साळी व रोहिना देशमुख यांनी पटकावला.
या कार्यक्रमाला सिनेसृष्टी, ब्युटी इंडस्ट्री, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिगग्ज मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात नीता कौल म्हणाल्या की सौंदर्यस्पर्धांचे स्वरूप शारीरिक सौंदर्य एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता सौंदर्यवतींचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, कार्यक्षमता यांच्या मूल्यमापनावर आधारित असते.
Web Title: Pune Beauty Maharashtra Anjali Gadoya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..