esakal | Pune : भारती विद्यापीठ आयएमईडीला ६९वे मानांकन
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : भारती विद्यापीठ आयएमईडीला ६९वे मानांकन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ँड आंत्रप्रूनरशीप डेव्हलपमेंट’ला (आयएमईडी) ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) सर्वेक्षणात ७५ मॅनेजमेंट संस्थांच्या क्रमवारीत देशात ६९ व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.

भारती अभिमत विद्यापीठाला राष्ट्रीय सर्वेक्षणाच्या विद्यापीठ क्रमवारीत ६८ वे मानांकन मिळाले आहे. या क्रमवारीत पुण्यातील केवळ २ मॅनेजमेंट कॉलेज असून, राज्यातील केवळ ९ मॅनेजमेंट महाविद्यालयांना स्थान मिळाले आहे. उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उत्तम शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच आयएमईडीला व्यवस्थापनाच्या शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान देणे शक्य झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया डॉ. सचिन वेर्णेकर यांनी व्यक्त केली. भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, सचिव डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी अभिनंदन केले.

loading image
go to top