
गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून बंद असलेला भिडे पूल आणखी दीड महिना बंदच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. महामेट्रोने मार्च महिन्यात या पुलाचं काम सुरू केलं होतं. सदाशिव पेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी भिडे पुलावर लोखंडी पादचारी पूल उभारण्याचं काम सुरू आहे. यासाठी मार्च पासून पूल बंद आहे. मात्र अद्याप पुलाचं काम पूर्ण झालं नाहीय. त्यामुळे आणखी दीड महिना हा पूल बंदच राहणार आहे.