

Bhide Bridge in Pune closed for vehicle traffic as Maha-Metro begins construction of a new pedestrian footbridge connecting Deccan Gymkhana Metro Station with Peth areas
esakal
पुणे : पुण्यातील मुठा नदीवरील भिडे पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठ परिसराशी जोडणारा नवीन पादचारी पूल उभारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत भिडे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, पुणे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासूनच ही वाहतूक बंदी लागू करण्यात आली असून, पुढील आदेश मिळेपर्यंत ती कायम राहणार आहे.