

Accelerated Construction Timeline
Sakal
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील भिडे वाडा स्मारकाच्या कामाला महापालिका प्रशासनाकडून वेग देण्यात आला आहे. आत्तापर्यंत दोन स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित तीन स्लॅबचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे भिडे वाडा स्मारकाच्या बांधकामासंबंधीची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत, तर बहुतांश कामे मार्गी लागून नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत स्मारकाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.