

Automatic Signaling System Approved
Sakal
प्रसाद कानडे
पुणे : पुणे ते भिगवण दरम्यान आता रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित सिग्नल यंत्रणा (ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीम) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेलादेखील सुरुवात झाली आहे. या १०३ किलोमीटरच्या अंतरावर प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर सिग्नलचे खांब असतील. त्यामुळे रेल्वे गाड्यांना मार्ग उपलब्ध होण्यासाठी थांबावे लागणार नाही. एकाच्या मागे एक रेल्वे धावतील. परिणामी, या मार्गाची वहन क्षमता वाढणार असून प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे.