केडगाव : ‘भीमा पाटस’चा जिल्हा बॅंकेला प्रस्ताव

‘वन टाइम सेटलमेंट’साठी प्रयत्न; अध्यक्ष राहुल कुल यांची माहिती
जिल्हा बॅंक
जिल्हा बॅंकsakal

केडगाव : ‘‘भीमा पाटस साखर कारखाना कायद्याच्या चौकटीत राहून पुन्हा सुरू करण्यासाठी पुणे जिल्हा बँकेला वन टाइम सेटलमेंटचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर पुढील आठवड्यात निर्णय अपेक्षित आहे. अडचणी आल्या नाही, तर येत्या हंगामात कारखाना चालू होईल, याची मला खात्री आहे. कारखान्याला मदत करायची नसेल; तर नका करू, मात्र अडचणी तरी आणू नका,’’ असे भावनिक आवाहन कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी केले आहे.

भीमा पाटस कारखान्याची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ३०) ऑनलाइन पद्धतीने झाली. त्यावेळी कुल बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कारखाना सुरू होण्यासाठी सर्वपक्षीय सहमती आहे. गटतट विसरून कारखाना चालू केला, असा एक चांगला संदेश राज्याला देण्याची सर्वांना संधी आहे. कारखाना चालू असताना निवडणूक लढविण्यास सर्वांना उत्साह राहील. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या ३६ कोटी रुपयांचा हिशेब राज्य सरकार व साखर आयुक्तांना दिलेला आहे. चौकशीची मागणी करण्याचा अधिकार सर्व सभासदांना आहे. कायदा पाळून उशिरा का होईना कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यानंतर देणी दिली जातील. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री अजित पवार, फडणवीस हे कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य करत आहेत.’’

जिल्हा बॅंक
नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीच्या चाचणीला दोन दिवसांत सुरुवात? 'अशी' असेल प्रक्रिया

वासुदेव काळे म्हणाले, ‘‘कारखाना सहकारी तत्त्वावरच चालू व्हावा. संचालक मंडळाने उचलींची वसुली कठोरपणे करावी.’’सत्त्वशील शितोळे म्हणाले, ‘‘मागील चुका उगाळत बसण्यापेक्षा कारखाना चालू करावा.’’ वैशाली नागवडे म्हणाल्या, ‘‘केंद्राप्रमाणे राज्य सरकार व जिल्हा बँक कारखान्याला मदत करीन.’’ योगेंद्र शितोळे म्हणाले, ‘‘कारखान्याने दिलेल्या १०९ कोटींच्या उचलीवर व्याज आकारावे.’’ वसंत साळुंके म्हणाले, ‘‘कारखाना सुरू झाला पाहिजे, ही प्रत्येक सभासदाची तळमळ आहे.’’

कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी अहवाल वाचन केले. सत्वशील नागवडे, निळकंठ शितोळे, गोरख दिवेकर, संजय इनामके, उमेश देवकर, हरिश्चंद्र ठोंबरे, किरण देशमुख, भानुदास शिंदे, नितीन म्हेत्रे आदींनी सभेत भाग घेऊन कारखाना सुरू करण्याची मागणी केली. सभा दोन तास चालली. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर व संचालक विकास शेलार यांनी स्वागत केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे यांनी आभार मानले.

जिल्हा बॅंक
पणजी: गोव्यातील जनमानसाचा कानोसा घेणारा ‘जनमन उत्सव’

ताकवणे यांचा आरोप

भीमा पाटस कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मला बोलू दिले नाही, याचा मी निषेध करतो, अशी टीका कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी केली. ते म्हणाले, ‘‘बोलण्यासाठी मी हात वर केला होता. कारखान्याकडे ३२ कोटी रुपयांच्या साखरेसह १५४ कोटी रुपये शिल्लक असताना कारखाना बंद का राहिला, हा प्रश्न आहे. संचालक मंडळाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. म्हणजे मग आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. कारखान्याच्या अध्यक्षांनी सभासदांच्या हक्कांची पायमल्ली केली आहे. याबाबत राहुल कुल म्हणाले, ‘‘ताकवणे यांचा विषय शुल्लक आहे. तो निषेधाचा विषय होऊ शकत नाही. मला त्यावर बोलायचे नाही. सर्वपक्षीय सभासदांना बोलण्याची संधी दिलेली आहे. कारखाना सुरू करण्यासाठी मदत करणार असतील तरच त्यांनी बोलावे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com