नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीच्या चाचणीला दोन दिवसांत सुरुवात? 'अशी' असेल प्रक्रिया

vaccine trial.
vaccine trial.e sakal
Updated on

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून (third wave of corona) लहान मुलांचा बचाव करण्यासाठी 'कोव्हॅक्सिन' लसीची (covaxin vaccine) मुलांवरील मानवी चाचणी (क्लिनिकल ट्रायल)नागपुरात (clinical trail of corona vaccination on children) सुरू होणार आहे. २ ते १८ वयोगटांतील जवळपास १०० ते १२५ मुलांवर ही चाचणी नागपुरात होईल. येत्या दोन किंवा तीन दिवसांत चाचणीला सुरुवात होणार आहे. चाचणी सुरू होण्यापूर्वी एकदिवस आधी लस पुरवठा होणार आहे. नागपुरात नोंदणीला सुरुवात झाल्याचे संकेत मिळाले आहेत. (corona vaccination trial on children may starts in two days in nagpur)

vaccine trial.
बिबट्या आला रे आला! पण, वनविभागाचे कर्मचारी पोहोचताच निघाला बोक्या

भारत बायोटेक कंपनीला लहान मुलांवर ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या ‘ट्रायल’साठी डीसीजीआयने मंजुरी दिली. नागपुरात वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खडतकर यांना या चाचणीसाठी परवानगी दिली. चाचणीपूर्वी लहान मुलांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. कोव्हॅक्सिन लस चाचणीत सहभागी लहान मुलांना ही लस दिली जाणार आहे, यानंतर अ‍ॅण्टिबॉडी तपासणी केली जाईल.

कोव्हॅक्सिन लसीची ही चाचणी वयोगट २ ते ६, पुढे ७ ते १२ आणि १३ ते १८ या अशा तीन वयोगटांत विभागण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटात जवळपास ३० मुला- मुलींचा सहभाग असेल. सुदृढ आरोग्य असलेल्या मुलांची निवड चाचणीसाठी करण्यात येईल.

देशातील नोएडा, पटना, हैदराबाद आणि नागपूर अशा चार केंद्रावर एकूण ५२५ मुलांची वैद्यकीय चाचणी प्रस्तावित आहे. पहिला डोस दिल्यानंतर रक्ताची चाचणी केली जाईल. २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार असेल. इथिकल समितीची मंजुरी मिळाल्यानंतर चाचणीला सुरुवात होईल.
-डॉ. वसंत खडतकर, बालरोग तज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com