

Jitesh Khutwad Cracks MPSC STI Exam
Sakal
पुणे : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम घेतले तर यश हमखास मिळते, हे हातवे खुर्द (ता. भोर) येथील जितेश अंकुश खुटवड याने सिद्ध केले आहे. त्याने अभ्यासात सातत्य ठेवत अनेक समस्यांवर मात करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब २०२४ या परीक्षेत यश संपादन करत राज्य कर निरीक्षक पदाला गवसणी घातली. आपला मुलगा सरकारी अधिकारी व्हावा, हे आई-वडिलांनी पाहिले स्वप्न त्याने साकार केले.