Contractors Agree to Reduced Biomining Rates in Pune
पुणे : फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोतील कचऱ्याचे जैविक उत्खनन करण्यासाठी ज्या ठेकेदारांनी प्रक्रिया शुल्कासाठी प्रति टन ७२५ रुपयांपेक्षा जास्त दर भरला होता ते ठेकेदार आता प्रति टन ५५० रुपयांनी करण्यास तयार होत आहेत. त्यांच्यासोबत महापालिका प्रशासनाची चर्चा सुरु असून, सोमवारपर्यंत सर्व ठेकेदार अंतिम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थायी समितीची होणार असून, त्यात या सर्व निविदा मान्य केल्या जाण्याची शक्यता आहे.