

Pune Fire Brigade Rescue
esakal
पुणे : येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील धोकादायक पाण्याची टाकी पाडताना आज बुधवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. सुमारे ५० फूट उंच असलेली ही टाकी अचानक कोसळल्याने एक कामगार मातीच्या आणि सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाऊन गंभीर जखमी झाला. मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर या कामगाराला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.