esakal | भाजप नगरसेवकाचे महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन; रुपालीताई चाकणकरांची कारवाईची मागणी

बोलून बातमी शोधा

भाजप नगरसेवकाचे महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन; रुपालीताई चाकणकरांची कारवाईची मागणी
भाजप नगरसेवकाचे महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन; रुपालीताई चाकणकरांची कारवाईची मागणी
sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या पुणे महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले आहे. वानवडी परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांनी पुणे महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्याशी हुज्जत घातली. नगरसेवक घोगरे यांनी बोलताना असभ्य भाषा वापरली व डॉक्टर वैशाली जाधव यांच्या अंगावर धावून गेले.भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांच्या या गैरवर्तनाचा सर्वपक्षीय महिला नेत्यांनी निषेध केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा: उद्यापासून 18 ते 45 वयोगटालीत लसीकरण नावालाच!

नगरसेवक घोगरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी नियमावली महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात यावी अशी मागणी चाकणकर यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. चाकणकर यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचीही भेट घेऊन कारवाई संदर्भातचे एक निवेदन त्यांनाही दिले आहे. यावेळी पुणे महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, राष्ट्रवादी महिला पुणे शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, सुहास चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर आदी उपस्थित होते.