Ganesh Bidkar : २५ लाख रुपये न दिल्यास बदनामी करून राजकीय जीवन उध्वस्त करून टाकू, भाजप नेते बिडकरांना धमकी

भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकावून २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Ganesh-Bidkar
Ganesh-Bidkarsakal
Summary

भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकावून २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे - भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकावून २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात गणेश बिडकर (वय ५०, रा. सोमवार पेठ) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडकर हे ३० मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास श्रीरामनवमी उत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मोबाईल व्हॉट्सअ‍ॅप कॉलवरून हिंदी, मराठी भाषेतून शिवीगाळ केली. तसेच, २५ लाख रुपये न दिल्यास बदनामी करून राजकीय जीवन उध्वस्त करून टाकू, अशी धमकी दिली. याबाबत सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून एका बिल्डरकडे तीन कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. नुकत्याच घडलेल्या या घटनेनंतर पुन्हा भाजप पदाधिकाऱ्यास आलेल्या खंडणीच्या धमकीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सायबर पोलिसांनी व्हॉटसॲप कॉलद्वारे खंडणी मागणाऱ्या मोबाइलधारकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सायबर पोलिसांनी व्हॉटसॲप कंपनीसोबत पत्रव्यवहार केला आहे.

- मीनल सुपे-पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पुणे सायबर पोलिस ठाणे.

Ganesh-Bidkar
Property Tax : पुणे महापालिका मिळकत कर बिलांचे वाटप 1 मेपासून करणार

राजकीय जीवनात अनेक वर्षे काम करीत आहे. परंतु अशा घडलेल्या प्रकारामुळे चिंता वाटते. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कोणीतरी जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे.

- गणेश बिडकर, माजी नगरसेवक, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com