पुणे भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार

चौकात, रस्त्यावर, पादचारी मार्ग, पथदिव्यांवर अनधिकृतपणे फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावून शहर बकाल केले जात आहे.
crime
crimeSakal
Summary

चौकात, रस्त्यावर, पादचारी मार्ग, पथदिव्यांवर अनधिकृतपणे फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावून शहर बकाल केले जात आहे.

पुणे - भाजपचे (BJP) शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या वाढदिवसानिमित्ताने (Birthday) शहरात शेकडो अनधिकृत शुभेच्छांचे बोर्ड (Hording) लावल्या प्रकरणी भाजपचे सरचिटणीस गणेश घोष व संदीप लोणकर या दोन पदाधिकाऱ्यांवर (Incumbent) शहर विद्रूपीकरणाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले आहे. कसबा विश्रामबागवाड्याचे सहायक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी हे पत्र विश्रामबाग पोलिस ठाण्याला दिला आहे.

चौकात, रस्त्यावर, पादचारी मार्ग, पथदिव्यांवर अनधिकृतपणे फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावून शहर बकाल केले जात आहे. यामध्ये बहुतांश राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या चमकोगिरीमुळे होणारे शहराचे विद्रूपीकरण थांबावे यासाठी ‘सकाळ’ने मोहीम सुरू केली, त्यास नागरिकांकडूनही पाठिंबा मिळत आहे. असे असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले.

भाजपचे शहराध्यक्ष मुळीक यांचा एक एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने भाजपचे शहर सरचिटणीस गणेश घोष व संदीप लोणकर यांनी शेकडो पथदिव्यांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बोर्ड लावले. हा प्रकार निदर्शनास आणल्या नंतर महापालिकेने बोर्ड हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपन अधिनियम १९९५चे कमल ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी विश्रामबाग पोलिसांना पत्र दिले आहे.

उपनगरात फ्लेक्स कायम

शहराच्या मध्यवर्ती भागातील फ्लेक्स हटवले असले तरी कात्रज, कोंढवा, हडपसर, औंध, बाणेर, कोथरूड, हडपसर, नगर रस्ता भाग फ्लेक्स, बोर्ड कायम आहेत. धायरी भाजपच्या एका माजी नगरसेवकाचे अनेक फ्लेक्स लागलेले असताना त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com