पुण्यात भाजपने दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलं तिकीट, निष्ठावंत नाराज; बंडखोरीची शक्यता

Pune BJP : पुण्यात भाजपने रविवारी रात्रीपासून एबी फॉर्म देण्यास सुरुवात केलीय. यात काही दिवंगत नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे. दरम्यान, काही कार्यकर्त्यांना डावलल्यानं उघड नाराजी व्यक्त केली जातेय.
BJP Ticket Row In Pune Loyal Workers Express Anger

BJP Ticket Row In Pune Loyal Workers Express Anger

Esakal

Updated on

पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युतीच्या चर्चा सुरू आहेत. अद्याप जागावाटपाचा पेच सुटलेला नाहीय. दरम्यान भाजपकडून काही उमेदवारांना रात्रीच एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय. यानंतर उमेदवार प्रचाराला लागले आहेत. पुण्यात भाजपनं १६५ पैकी १०० जागा लढवण्याची तयारी केलीय. यापैकी ६० पेक्षा जास्त जागांवर उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com