पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

In Pune BJP workers including MP Girish Bapat were taken into police custody
In Pune BJP workers including MP Girish Bapat were taken into police custody
Updated on

पुणे : पीएमपीएल बस सेवा बंद केल्याने पुणेकरांची गैरसोय  होत असून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट पीएमपीएल डेपोसमोर या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आले होते. यावेळी ''पुण्याच्या रक्तवाहिनीला वेठीस धरु नका'' अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांसह बापट यांनी पीएमपीएल बसमध्ये बसून आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीनंतर पुणे, पिंपरी, आणि जिल्ह्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान, हॉटेल, मॉलसह पुण्यातील सार्वजनिक वाहतूकीचा कणा असलेली पीएमपीएल देखील आजपासून पुढील 7 दिवस बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत या निर्णयाला विरोध केला. पुणेकरांची गैरसोय पीएमपीची बससेवा बंद असल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

''आम्हाला सरकारला सहकार्य करायचे आहे, राजकारण करायचे नाही. चुकीच्या नियोजनाचा  किती मोठा फटका बसतो याचा अनुभव घेतला आहे'' यावरुन सरकारने शहाणे व्हावे'' अशी खोचक प्रतिक्रिया बापट यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपचे शहरध्यक्ष जगदीश मुळीक येथे उपस्थित होते. 

इतके कनफ्युज मुख्यमंत्री बघितले नाहीत - मनसे

दरम्यान स्वारगेट डेपो येथे सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान, पीएमपीएल अधिकारी व पोलिसांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. शहरात जमावबंदी लागू असून आंदोलन संपविण्याची विनंती केली. मात्र, ही विनंती धू़डकावून आंदोलन माघार घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी बापट यांच्यासह आक्रमक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी असा असेल मेगाब्लॉक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com